top of page

e-Saheli बद्दल

e-Saheli हा महिलांना सक्षम बनवण्यासाठी समर्पित असलेला एक ऑनलाइन कौशल्यविकास प्लॅटफॉर्म आहे, जो विशेषतः भारतातील टियर 2, 3 आणि 4 शहरांमधील महिलांसाठी उपयुक्त आहे. आम्ही ब्युटी, फॅशन, व्यवसाय, स्वयंपाक आणि वैयक्तिक वित्त व्यवस्थापन  यांसारख्या क्षेत्रांतील व्यावहारिक आणि उद्योगमान्य कोर्स फक्त ₹499 पासून सुरू करतो.

 

आमचा उद्देश महिलांसाठी शिक्षण सुलभ, परवडणारे आणि प्रभावी बनवणे आहे, ज्यामुळे त्यांना आर्थिक स्वावलंबनासाठी आवश्यक कौशल्ये मिळू शकतात. कोणत्याही अतिरिक्त शुल्कांशिवाय प्रमाणपत्र, कार्यशाळा आणि प्रदर्शनांसाठी प्रवेशासारख्या विशेष सुविधा देणारा, e-Saheli हा केवळ एक ई-लर्निंग प्लॅटफॉर्म नाही—तर महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी एक उपक्रम आहे.

f3e7cfe3dc.jpg

आमचे ध्येय

e-Saheli चे ध्येय संपूर्ण भारतभर महिलांना परवडणाऱ्या कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबी बनवणे आहे. महिलांना स्वतःच्या अटींवर शिकण्यापासून, वाढण्यापासून आणि कमाई करण्यापासून रोखणारे आर्थिक आणि भौगोलिक अडथळे दूर करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

आमचे स्वप्न असे आहे की प्रत्येक महिलेला तिच्या पार्श्वभूमी किंवा स्थानाची पर्वा न करता उच्च-स्तरीय, करिअर-केंद्रित प्रशिक्षण मिळावे. पारंपरिक प्रशिक्षणाच्या तुलनेत अतिशय कमी खर्चात व्यावहारिक आणि नोकरीस अनुकूल असलेले कोर्स उपलब्ध करून देऊन, आम्ही शिक्षण आणि कमाई यामधील अंतर भरून काढण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून लाखो महिलांसाठी आर्थिक स्वावलंबन सहज शक्य होईल.

आमची वाटचाल

कौशल्य विकासाद्वारे महिलांचे सक्षमीकरण

भारतामधील अनेक महिला शिकण्याची इच्छा बाळगतात, पण त्यांना व्यावसायिक प्रशिक्षणासाठी आर्थिक किंवा सामाजिक पाठबळ मिळत नाही.

ब्युटी अकॅडमीमधून मिळालेली प्रेरणा

महिलांना शिकण्याची आवड होती, पण जास्त शुल्क परवडत नव्हते किंवा इतर ठिकाणी जाऊन शिकणे शक्य नव्हते.

आकांक्षा आणि सुलभता यामधील अंतर भरून काढणे

e-Saheli हे कौशल्य विकासासाठी परवडणारे ऑनलाइन प्लॅटफॉर्म म्हणून तयार करण्यात आले.

 

पारदर्शक आणि परवडणारे शिक्षण

कोर्स फक्त ₹499 पासून सुरू होत असून, कोणतेही लपवलेले शुल्क किंवा अतिरिक्त विक्रीमूल्याचा आग्रह नाही.

 

ब्युटी कोर्सच्या पलीकडे विस्तार

आता फॅशन, व्यवसाय कौशल्य, स्वयंपाक, वैयक्तिक वित्तव्यवस्थापन आणि बरेच काही शिकवले जाते.

 

एक चळवळ, फक्त एक प्लॅटफॉर्म नाही

भारतभर महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील.

e9219eae18.jpg

संस्थापकांच्या संकल्पनेतून 

e-Saheli ही शिक्षण, उद्योग आणि व्यवसायातील तज्ज्ञांनी स्थापन केलेली संस्था आहे, ज्यांचा विश्वास आहे की कौशल्याधारित शिक्षण महिलांच्या जीवनात चांगले बदल घडवू शकते.

आमच्या टीममध्ये शिक्षण, डिजिटल लर्निंग, व्यवसाय विकास आणि विविध उद्योग कौशल्यांचे तज्ज्ञ आहेत, जे प्रत्येक कोर्सला व्यावहारिक, करिअर-उन्मुख आणि सर्व पार्श्वभूमीतील महिलांसाठी सुलभ बनवतात.

कौशल्य विकासाला किफायतीशीर, दर्जेदार आणि सुलभ बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. महिलांनी  विशिष्ट कौशल्य विकासाच्या शिक्षणातून व्यावसायिकदृष्ट्या प्रगत आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनावे, यासाठी आमची टीम सतत प्रयत्नशील आहे.

मुख्य वैशिष्ट्ये

esaheli is affordable

किफायतशीर: कोर्स फक्त ₹499 पासून सुरू

esaheli - online courses

ऑनलाइन प्रवेश: कधीही शिका, कुठेही शिका

esaheli expert

तज्ज्ञ मार्गदर्शन: व्यावहारिक, सोप्प्या

शिक्षण पद्धती 

esaheli is convenient

दीक्षांत समारंभ: वार्षिक दीक्षांत समारंभ

esaheli available in native language also

तुमच्या भाषेत: मातृभाषेतील शिक्षणप्रणाली

बातम्या आणि माध्यमे

e-Saheli ला विविध डिजिटल मीडिया आणि प्रकाशनांमध्ये स्थान मिळाले आहे. यासोबतच अनेक माध्यमांतून महिलांसाठी कौशल्य-आधारित शिक्षण देणाऱ्या या प्लॅटफॉर्मचे कौतुक केले गेले आहे. आमच्या उपक्रमामुळे शिक्षण परवडणारे आणि सुलभ झाले असून महिलांना आर्थिक प्रगती आणि स्वावलंबनासाठी उपयुक्त कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळत आहे.

कसे काम करते ?

choose your favourite course on esaheli portal
esaheli arrow
watch videos on esaheli portal
esaheli arrow
complete your assignments given by esaheli tutors
esaheli arrow
get certified by completing course at esaheli
esaheli arrow
start earning with esaheli

पायरी १ :
कोर्स निवडा

पायरी २ :
व्हिडिओ लेक्चर्स बघा

पायरी ३ :
शंका निरसन करा

पायरी ४ :
प्रमाणपत्र मिळवा

पायरी ५ :
कमाई सुरू करा

आमच्या विद्यार्थिनी काय म्हणतात…

आमच्या यशस्वी विद्यार्थिनींच्या अनुभव जाणून घ्या.

प्रमाणपत्र मिळवा

लवकरच येत आहे…

  • सरकारी अनुदान आणि कर्ज योजनांची माहिती

  • करिअर मार्गदर्शन

  • प्लेसमेंट संधी

कोणत्याही कोर्ससाठी नोंदणी करा आणि वार्षिक दीक्षांत सोहळ्याला

व टॅलेंट मीट एन नर्चर वर्कशॉपमध्ये मोफत प्रवेश मिळवा.

मुख्य वैशिष्ट्ये 

सेलिब्रिटी मान्यताप्राप्त प्रमाणपत्र • 5 मोफत व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा • विनामूल्य गिफ्ट बॅग्स
• प्रदर्शनात सहभाग • कॉन्सर्टमध्ये मोफत प्रवेश

करिअर टिप्स आणि ऑफर मिळवा

esaheli logo white

रियांश एडटेक प्रायव्हेट लिमिटेड
A-104, कोटीभास्कर बिझनेस कोर्ट, जी ए कुलकर्णी पथ, कोथरूड,
पुणे, महाराष्ट्र 411038 भारत. संपर्क: +91 8855 085 111

  • Instagram
  • Facebook
  • X
  • LinkedIn
  • Youtube

© 2025 e-saheli. Designed with love by Bigfoot Dzine

bottom of page